...तिचं आणि माझं...' जग दोघांचं '....
या माझ्या काव्यसंग्रहातील..
लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या काही निवडक कविता ...

Saturday, August 21, 2010

आरसा


आरसा

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
तुला कळेल तू किती लाडकी आहेस कुणासाठी
तुझी अदा किती गोड,
तू इतकी सुंदर कशासाठी ....

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
खूप काही वेगळं दिसेल तुला
जे तू यापूर्वी कधीच पाहिलं नव्हत
काहीतरी आश्चर्यचकित करणारं
जे अगोदरही तुझ्या अगदी जवळ होतं

आरश्यात बघ माझ्या नजरेतून
गालांवर ओघळेल तुझ्या लाली
सेच्कांदागानिक मिचमिचणाऱ्या
तुझ्या पापण्या वरखाली

आरश्यात बघ माझ्या नजरेतून

आणि हो नजर काढ बरं स्वतःची
लागू नाय याच्यासाठी
कारण तुझी अदा किती गोड,
तू इतकी सुंदर कशासाठी ....

1 comment:

  1. बघितल जेव्हा आरश्यात स्वताला
    हाय! परी तारुण्याची भासले या नजरेला
    तोहफा स्वीकारावा या नजरेचा
    ज्याने हि नजर दिली या नजरेला

    ReplyDelete