...तिचं आणि माझं...' जग दोघांचं '....
या माझ्या काव्यसंग्रहातील..
लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या काही निवडक कविता ...

Saturday, August 7, 2010

गुड मॉर्निंग !!!!


सकाळीच तुझी आठवण आली
कानात काहीतरी बोलून गेली
स्वप्नात रात्री काय काय घडलं
सारी गुपितं खोलून गेली

आता दिवस कसा सुखाचा जाईल
काहीवेळाने तुझा फोनही येईल
दुधात खरी साखर पडेल
जेव्हा तुझ्या आवाजात गुड मॉर्निंग होईल

फोन नाही जमला तर एसेमेस कर
तेही नाही जमलं तर माझं नाव मनात धर
घाबरू नकोस मी रागावणार नाही
वाट बघेन तुझी आयुष्यभर

1 comment:

  1. एसेमेस कशाला गुड मोर्निंगच म्हणते
    बस कान नाही मन लाव इकडे
    हा एक तक्रार मात्र नक्की नोंदवते
    आठवन येण्याएवडी माझी विसर कशी पडते

    ReplyDelete