
तू नसताना ....
तू नसताना असे वाटते, कोणीच नाही माझे
ढासळलेल्या बुरुजाच्या, किल्लाचे आम्ही राजे
फुल असे हातात तरीही, असंख्य बोचती काटे
तू नसताना चंद्रकोर हि, अर्धी तुटकी वाटे
असंख्य वादळ मनी घूसळती, भलते काहूर माजे
तू नसताना असे वाटते, कोणीच नाही माझे
तू नसताना वेळ मोकळा, म्हणतो काय करावे
मी हि त्यांला म्हणतो चल, नियतीचे पाय धरावे
संगीत जाई संपावरती, किन्नर कानी वाजे
तू नसताना असे वाटते, कोणीच नाही माझे
तू नसताना काहीच नाही, उरले माझ्यापाशी
झोपही गेली मी तळमळतो, घेऊन जाग उश्याशी
शरमिंदा झाले नशीबहि, ठाऊक नाही उद्याचे
तू नसताना असे वाटते ,कोणीच नाही माझे
कवी किरण
Kiran, Masta ahe kavita.
ReplyDeleteMala kahi faar kalat nahi pan, "वादळ" chya jagi "Wadale" as kelas tar wachtana maja yeil asa watla mala.
Pls kahi chukla tar maaf kar :)
तू नसताना तूच असतेस, माझ्या भोवताली
ReplyDeleteसांग सखे मी कसा विसरू, जी माझ्यातच रुझलेली
विसरतो मी या दुनियेला, माझे जीवन असणे तुझे
तू नसताना असे वाटते ,कोणीच नाही माझे